श्रीमद वाल्मीकि रामायण – मराठी अनुवादित

Original price was: ₹1,550.00.Current price is: ₹980.00.

  • प्रत्येक घरी संग्रहणीय असावं असं महाकाव्य.
  • आपल्या प्रियजनांस देण्यास अशी पवित्र भेट.
  • विष्णूच्या दशावतारात जनसामान्यांच्या अत्यन्त आदराचा व अनुकरणीय अवतार म्हणजे श्रीराम.
  • मूळ वाल्मीकि रामायण – संपूर्ण मराठी
  • 1.5 किलो – 984 पृष्ठे | हार्ड बाइंडिंग
  • Free Home Delivery
Category:
प्रत्येक घरी संग्रहणीय असावं असं महाकाव्य, आपल्या प्रियजनांस देण्यास अशी पवित्र भेट.

राम हा शब्दच मंत्ररूप आहे.या शब्दाचा जनमानसावर एवढा प्रचंड पगडा आहे की, भारताबाहेर विदेशातही राम नाम अनुस्यूत असलेली व्यक्तींची नावे गावाची नावे दिसतात. पौर्वात्य देशात रामाचा प्रभाव भारताइतकाच आहे.

राम व कृष्ण हे दोन्ही अवतार मानवाशी जवळचे असले तरी आदर्श म्हणून रामाचे चरित्र मनुष्यला अनुकरणीय आहे.
मनुष्य म्हटला की तो सुखदुःखात जीवन जगतो.

अतिसुखाने हुरळून जातो व अमर्याद वागत सुटतो तर अति दुःखाने एवढा खचतो की आत्मभान विसरून हातपाय गळून बसतो. या दोन्ही तऱ्हा अतिरेकी आहे हेच रामचरित्र ठायीठायी सांगत असते.

देव असूनही रामाने मानव जीवनात एवढी दुःखे भोगली की सामान्याचा तोल गेला असता, पण रामाने स्वजीवनात दुःखाघाताने कधीही पौरुषत्वाची मर्यादा ओलांडली नाही म्हणूनच त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात.

रामाच्या वाट्याला अनेक दुःख होती तरी तो डगमगला नाही. कारण परिस्थितीला कसे सामोरे जायचे व संतुलन कसे ठेवायचे हे रामाने जगाला दाखवले. मातृदेवो भव पितृदेवो भव याचा आदर्श रामाने कटाक्षाने पाळला. बंधुप्रेमाचा आदर्श रामाने घातला, भक्तीप्रेमाचा आदर्श रामाने घातला. अशी आदर्श चरित्रागाथा म्हणजे वाल्मिकी रामायण.

मानवी जीवनाचा शाश्वत दिव्यादर्श चित्रित करण्याच्या प्रेरणेतूनच वाल्मीकीच्या रामायणाची निर्मिती झाली. आदीकाव्य म्हणून हे ऐतिहासिक महाकाव्य साऱ्या जगाने शिरोधार्थ मानले.

मूळ रामायण संस्कृतमध्ये रचलेले असल्यामुळे संस्कृत भाषा न जाणणाऱ्या लोकांना मुळात काय लिहिले आहे हे माहीत नसते, त्यामुळे रामयणाबद्दल भ्रामक कल्पना झालेल्या आढळतात.

मूळ रामायणाच्या मराठी अनुवादामुळे ही गैरसोय दूर होईल, मूळ रामायणात काय सांगितले आहे हे लोकांना कळेल, केवळ संस्कृत भाषा माहीत नसल्यामुळे जे रामायणाबद्दल संशोधन करू शकत नाहीत त्यांना संशोधन करण्यास वाव मिळेल.

श्रीमद वाल्मिकी रामायण मराठी अनुवाद

।। जय श्रीराम ।।

Weight 1.5 kg
Dimensions 25.3 × 18.2 × 4.2 cm